प्रिय माजी विद्यार्थ्यांनो,
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगुरु या नात्याने तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. ज्या विद्यापीठात तुम्ही शिकलात, स्वत:च्या भवितव्याला आकार देण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि प्रेरणा या बाबी ज्या विद्यापीठातून तुम्ही प्राप्त केल्यात त्या विद्यापीठात मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि रोजगाराभिमुखता यांबाबत खान्देशच्या युवा पिढीला सक्षम करण्यासाठी आपले विद्यापीठ गेल्या बत्तीस वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहे. सुरम्य नैसर्गिक परिसर, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, वसतिगृहे यांच्या सोबतच तज्ञ आणि अनुभवी अध्यापक वर्ग यांच्या बळावर सुरू असलेल्या विद्यापीठाच्या वाटचालीचे तुम्ही साक्षीदार व्हावे अशी आमची अपेक्षा आहे. विद्यापीठात सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त केलेल्या व्यावसायिक यशाबद्दल जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
तुम्ही माजी विद्यार्थी म्हणून नोंदणी करावी आणि विद्यापीठाशी जोडले जाऊन माजी विद्यार्थी संघ बळकट करावा, असे आवाहन मी तुम्हां सर्वांना करीत आहे. तुमच्या सातत्यपूर्ण सहकार्याने विद्यापीठाचा येणाऱ्या काळातील प्रवास निश्चितच संस्मरणीय होईल याची मला खात्री आहे.
( प्रा. विजय ल. माहेश्वरी )
कुलगुरु