Foundation Course for all Competitive Exams

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संलग्नीत महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादन करण्याच्या दृष्टीने होतकरू विद्यार्थ्याना स्पर्धा परिक्षाबद्दल मार्गदर्शन करण्याच्या हेतूने Kavayitri Bahinabai Chaudhari Online Competitive Exam Guidance Centre (Foundation Course for all Competitive Exams) या उपक्रमाचे मा. कुलगुरू महोदयाच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कबचौउमवि, जळगाव तर्फे आयोजन करण्यात येणार आहे.

कोर्स विषयी माहिती व नियमावली

सदर कोर्ससाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या पात्रतेचे निकष निर्धारित केलेल्या अटीनुसार पात्र व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराट्र विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयात प्रवेशीत किंवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. सदर कोर्स साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रवेश घेण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. या कोर्ससाठी नाममात्र प्रवेश फीस रु. १००/- (रुपये शंभर मात्र) निश्चित करण्यात आली आहे, सदरची प्रवेश फी ऑनलाइन पेमेंट गेटवे च्या माध्यमातून स्वीकारली जाईल.

  • रोज संध्याकाळी ९० मिनिटांची एक तासिका या पद्धतीने तासिकांचे आयोजन करण्यात येईल. जेणेकरून या तासिका मध्ये मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक व विद्यार्थी यांना सोईचे होईल

  • सदर कोर्स हा zoom प्रणाली subscribe करून पूर्ण ऑनलाइन पद्धतीने शिकवला जाईल

  • सर्व तासिकांचे रेकॉर्डिंग करून ते पुढे विद्यार्थ्याना यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल

  • ९० मिनिटाच्या एका तासिकेसाठी रु. १०००/- (रु. एक हजार मात्र) मानधन दर महिन्याला मार्गदर्शकाच्या बँक खात्यात TDS कापून विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाकडून जमा करण्यात येईल

  • या कोर्सच्या सुरुवातीला ५-६ तासिका या सर्व स्पर्धा परीक्षा व त्यांचे स्वरूप, प्रश्नपत्रिकाचे स्वरूप, पात्रता निकष यावर आधारित असतील. पुढील ६-७ तासिका या Study Skill सेशन्स वर आधारित असतील

  • प्रत्येक तासिके नंतर मार्गदर्शकाचा शिकविण्याविषयीचा feedback विद्यार्थ्यांकडून घेतला जाईल

  • प्रत्येक तासिकेला कोर्ससाठी प्रवेशीत विद्यार्थ्याना हजर राहणे अनिवार्य असेल व तासिके दरम्यान हजेरी नोंदवण्याची लिंक शेअर केल्यावर त्यांना त्यांची हजेरी नोंदविणे अनिवार्य राहील

  • सर्व तासिकांचे रेकॉर्डिंग करून ते पुढे विद्यार्थ्याना private यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल

  • प्रत्येक विषयावर आधारित Test Series चे नियमित आयोजन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल

  • मार्गदर्शकानी उपलब्ध करून दिलेल्या नोट्स pdf किंवा power point प्रेझेंटेशन विद्यार्थ्यासोबत शेअर केले जाईल

  • प्रत्येक तासिके आधी सदर तासिके संदर्भात flyer, डिजिटल पोस्टर, वृत्तपत्र, आकाशवाणी किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पब्लिसिटी करण्यात येईल

  • सदर कोर्सच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक महाविद्यालयाने नेमलेल्या स्पर्धा परीक्षा समन्वयकाना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जाईल

  • प्रत्येक महाविद्यालयाने नेमलेल्या स्पर्धा परीक्षा समन्वयकाची एक कार्यशाळा विद्यापीठात विद्यार्थी विकास या विभागाकडून आयोजित करण्यात येईल

  • प्रत्येक महाविद्यालयास सदर उपक्रमाबद्दल पोस्टर तयार करून ते महाविद्यालयात दर्शनी भागात लाऊन या उपक्रमविषयी पब्लिसिटी करणे अनिवार्य राहील

  • प्रत्येक महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेच्या पायाभूत अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तक संचाची यादी देऊन ती त्या महाविद्यालयाने खरेदी करावी किंवा सदर पुस्तकांचा संच विद्यापीठ महाविद्यालयास उपलब्ध करून देईल, जेणेकरून हा संच विद्यार्थ्याना अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल

  • सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या ३०० तासिकाचे प्लॅनिंग सोबत ‘प्रपत्र-अ’ म्हणून जोडले आहे, ह्या ३०० तासिका ६-८ महीने या कालावधीमध्ये पूर्ण होतील

सल्लागार समिती

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील सल्लागार समिती (Advisory Committee) गठित करण्यात आली आहे.

Sr. No.

Name

Designation

1.

प्रा. व्ही.एल.माहेश्वरी, मा. कुलगुरू महोदय, कबचौउमवी, जळगाव

अध्यक्ष

2.

प्रा. एस.टी.इंगळे, मा. प्र. कुलगुरू, कबचौउमवी, जळगाव

सदस्य

3.

श्री. अमोल पाटील, मा. व्यवस्थापन सदस्य, कबचौउमवी, जळगाव

कार्यकारी अध्यक्ष

4.

श्री. कपिल ज. पवार मा. उपसंचालक, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

सदस्य

5.

डॉ. जयेंद्र लेकुरवाडे, मा. संचालक विद्यार्थी विकास, कबचौउमवी,जळगाव

सदस्य

6.

प्रा. आशुतोष पाटील, मा. संचालक, आजीवन अध्ययन विभाग, कबचौउमवी, जळगाव

सदस्य

7.

श्री. सुभाष पवार, आजीवन अध्ययन विभाग, कबचौउमवी, जळगाव

सदस्य

8.

श्री. जयदीप पाटील, नोबेल फाउंडेशन, जळगाव

आमंत्रित सदस्य

9.

श्री. यजूवेंद्र महाजन, दीपस्तंभ अकॅडेमी, जळगाव

आमंत्रित सदस्य

10.

श्री. रवींद्र पाटील, मा. वित्त व लेखा अधिकारी, कबचौउमवी, जळगाव

सदस्य

11.

डॉ. अजय उत्तमराव सुरवाडे, मा. संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्प.प.मा.कें

सदस्य सचिव