Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

प्रा. अजय पाटील

संचालक,
सामाजिकशास्त्र प्रशाळा,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
सामाजिकशास्त्र प्रशाळा
Minimize

विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य आणि भाषा यांचा बरोबरीने विद्यापिठातील शिक्षणप्रक्रियेला मजबूत करण्याच्या भूमिकेतून सामाजिकशास्त्र प्रशाळेची निर्मिती झाली आहे. या प्रशाळेत एम.ए, एम.फिल, पीएच.डी. हे अभ्यासक्रम चालवले जातात. या अभ्यासक्रमांमध्ये जागतिकीकरणाचे बदलते युग व त्याचे सामाजिक व्यवस्थेवर होणारे परिणाम आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थितीतून निर्माण होणारी आव्हाने यांचा अभ्यास केला जातो. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि युवक विकास साध्य करणे ही प्रशाळेची प्रमुख उदिष्ट आहेत. सामाजिकशास्त्र आणि मानवविद्या यांच्या संशोधनात नव्या दिशा आज  निर्माण झाल्या आहेत. हे ही लक्षात घेऊन संसोधानाच्या विविध क्षेत्राना प्रशाळा उत्तेजन देते. या शिवाय स्पर्धा परीक्षा, NET/SET यांचे मार्गदर्शनही केले जाते.

ठळक वैशिष्टे
Minimize

वेगळे  वैशिष्टे

अनुभवी अध्यापक वर्ग, तज्ज्ञ  मार्गदर्शन, व्यवसाय अभिमुख पाठ्यक्रम, अभ्याससहल , इंटरनेट सुविधा, कमवा व शिका योजना, विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धा आयोजन, राष्ट्रीय सेवा योजना, नोकरी व व्यवसाय विषय मार्गदर्शन, कार्यशाळा व परिषदांचे आयोजन, नेट/सेट मार्गदर्शन वर्ग, वसतिगृह सुविधा

विशेष  वैशिष्टे

प्रशाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज  अध्यासन  आणि संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मराठ्यांच्या इतिहासासंबंधीचे लेखन, संशोधन, प्रकाशन यांचा करता इतिहास तज्ज्ञांच्या सहकार्याने आणि सार्वजनिक निधीतून याकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच खानदेश आणि महाराष्ट्र राज्य यासंबंधीची ऐतिहासिक कागदपत्रे गोळा करणे, त्यांचे जतन करणे आणि संशोधक विद्यार्थांना प्रेरणा देणे या हेतूने खानदेश अभिलेखागार व संग्रह्रालय स्थापन करण्यात आली आहे. 

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon