Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

प्रा. डी. एस. पाटील

संचालक,
एम. एस.सी., पी.एच.डी.
भौतिक शास्त्र प्रशाळा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव

भौतिकशास्त्र प्रशाळा
Minimize

भौतिकशास्त्र प्रशाळेत दोन विभाग आहेत.  (1) भौतिकशास्त्र  विभाग  (2) इलेक्ट्रॉनिक्स विभाग. प्रथम १९९१-९२ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला सुरूवात झाली.  त्यानंतरच्या वर्षात भौतिकशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. ज्यात, मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज असे दोन स्पेशलायझेशन सुरू करण्यात आले. 

सध्या या प्रशाळेत 10 पूर्णवेळ शिक्षक आहेत. ज्यापैकी 2 प्राध्यापक, 5 सहयोगी प्राध्यापक आणि 3 सहायक प्राध्यापक आहेत. ही प्रशाळा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक उपक्रमात आणि संशोधनात प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साहाय्या व्यतिरिक्त प्रशाळेस विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डी.एस.टी.) नवी दिल्ली कडून एफ.आय.एस.टी. कार्यक्रमांतर्गत सन 2005 साली मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे.  या प्रशाळेतील शिक्षकांना व्यक्तिगत स्तरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन प्रकल्पासाठी सी.एस.आय.आर नवी दिल्ली, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली, ए.आय.सी.टी.ई, नवी दिल्ली, एम.एन.ई.एस., नवी दिल्ली, डी.एस.टी., नवी दिल्ली, बी.आर.एन.एस., अणुऊर्जा विभाग (डी.ए.इ), मुंबई आणि टी.डब्लू.ए.एस., इटली यांच्याकडून निधी प्राप्त झाला आहे.

कंपनीच्या अधिकतम मागण्या पूर्ण करण्यासाठी संशोधन आणि उच्च दर्जाचे शिक्षण देणारी प्रशाळा म्हणून या प्रशाळेस मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.टेक. (व्ही.एल.एस.आय. तंत्रज्ञान) अभ्यासक्रमाला सन 2005 सालातील  नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत अभियांत्रिकी विभागात चालविण्यास परवानगी दिलेली आहे.

Copyright 2012 by North Maharashtra University,Jalgaon.