Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

 

प्रो. व्ही. एल. माहेश्वरी
प्राध्यापक व संचालक 
जीवशास्त्र प्रशाळा,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

जीवशास्त्र प्रशाळा
Minimize

जीवशास्त्र प्रशाळेची स्थापना 1991 मध्ये झाली. या प्रशाळेत मायक्रोबॉयोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी या तीन विभागांतील एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरु आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सुंदर परिसरात 26353.17 चौ.फूट क्षेत्रात प्रशाळेची इमारत आहे. प्रशाळेतील एकूण प्रयोगशाळा क्षेत्रफळ 13,500 चौ.फूट आहे. प्रशाळेतील अध्यापकांची संख्या 12 असून जीवशास्त्रांच्या संशोधनासाठी आवश्यक मध्यवर्ती साधनविनियोग सुविधेने प्रशाळा सुसज्ज आहे.

प्लान्ट टिश्यू कल्चर, सायनोबॅक्टेरिया, प्रोबायोटिक्स, सायडेरफोअर, बायोफ्यूल, फर्मेंटेशन(10 L) इत्यादी अन्य स्वतंत्र आणि वैशिष्ट्यूपूर्ण प्रयोगशाळा देखील प्रशाळेचा अविभाज्य भाग आहेत. NME-ICT या प्रकल्पांतर्गत १ Gbps इंटरनेट सुविधा असलेले डिजिटल ग्रंथालय प्रशाळेत आहे. याशिवाय ग्रीन हाऊस (हरितगृह) सुविधा,6 पदव्युत्तर प्रयोगशाळा (2 प्रत्येक विभागानुसार), दोन शीतगृहे आणि -200C आणि - 800C पर्यंत रेफ्रिजेशनची सुविधा प्रशाळेत उपलब्ध आहेत.

2 कोटीहून अधिक रकमेचे अनेक संशोधन प्रकल्प प्रशाळेतून पूर्ण झाले आहेत. सध्या यूजीसी, डीबीटी, डीएसटी, आरजीएसटीसी आदि विविध शासकीय संस्थांकडून अनुदानित सुमारे 3 कोटीचे 12 संशोधन प्रकल्प प्रशाळेत सुरु आहेत. प्रशाळेला यूजीसी (यूजीसी -सॅप-डीआरएएस) आणि डीएसटी (डीएसटी-एफआयएसटी) अंतर्गत विशेष अनुदान प्राप्त झाले आहे.

जीवशास्त्रांशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा आणि उद्‌बोधन वर्गांचे अयोजन नेहमी प्रशाळेकडून केले जाते. तसेच खानदेशातील शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी बायोफर्टीलायझरस्‌ (जैवखते) पुरविण्याच्या बाबतील (प्लॉन्ट ग्रोथ प्रमोटर्स, ट्रायकोड्रमा, फॉस्फेट, सॉलयुबलायझस्‌ इ.) प्रशाळेकडून ना नफा ना तोटा या तत्वावर विस्तार उपक्रमांचेही आयोजन केले जाते.

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon