Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

 

डॉ. एस. टी. इंगळे  
संचालक,
पर्यावरण आणि भूगर्भ शास्त्र  प्रशाळा,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

पर्यावरण आणि भूगर्भशास्त्र प्रशाळा
Minimize

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पर्यावरण आणि भूगर्भशास्त्र या प्रशाळेची स्थापना १ जुलै, १९९९ रोजी झाली. या प्रशाळेच्या इमारतीचे बांधकाम ७५०० स्क्वे.फू. आहे. पर्यावरणशास्त्र आणि भूगर्भशास्त्र क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या प्रशाळेत उत्तम प्रयोगशाळा आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहेत. प्रा. एस. टी. इंगळे या प्रशाळेचे संचालक आहेत. विकासाच्या प्रक्रियेत इको फ्रेंडली अ‍ॅप्रोच ही या प्रशाळेने विकसित केलेली एकमेवाव्दितीय पध्दती आहे.

या प्रशाळेतर्फे चार पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. ज्यात पर्यावरणशास्त्र, अप्लाईड जिऑलॉजी, अप्लाईड भूगोल आणि पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान यातील एम.टेक. या विषयांचा समावेश आहे. डी.एस.टी., युजीसी, एमओइएफ, युनिसेफ, डीआरडीओ, एमओडब्ल्यूआर यासारख्या संस्थांकडून प्रशाळेला प्रकल्प निधी प्राप्त झालेला आहे. या प्रशाळेला विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत (युजीसी सॅप-डीआरएस फेज-१) यु.जी.सी. कडून ५ वर्षांकरिता (२००९-२०१२) अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे.

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon