Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
शैक्षणिक विभाग
Minimize

*एम्.एस्सी. प्रथमवर्ष (सेमिस्टर - १ आणि २) प्रशाळेतील सर्व अभ्यासक्रमांसाठी समान.

**एम्.एस्सी. व्दितीय वर्ष (सेमिस्टर - ३ आणि ४) खाली दिलेल्या स्पेशलायझेशननुसार वेगवेगळे.

पॉलिमर केमिस्ट्री विभाग: या विभागाने पॉलिमर सायन्सेसचे महाराष्ट्रातील उत्कृष्ट केंद्र म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या अभ्यासक्रमात पॉलिमर सिन्थेसिस, कॅरक्टररायझेशन, प्रोसेसिंग आणि उपयोजना यावर भर देण्यात आलेला आहे. उपकरणांनी सुसज्ज अशा पॉलिमर प्रोसेसिंग आणि कॅरेक्टररायझेशन प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आलेली आहे.

पेस्टीसाईड्स आणि अ‍ॅग्रोकेमिकल्स विभाग: या विभागात नवीनतम अभ्यासक्रम राबविण्यात येतात ज्यात सिन्थेसिस आणि फॉर्म्युलेशन ऑफ पेस्टीसाईडस, पेस्टस आणि पेस्ट मॅनेजमेंट आणि मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस ऑफ फर्टिलायझेर अंतर्भूत आहेत. 

इंडस्ट्रीयल केमिस्ट्री विभाग: फार्मास्युटीकल्स्, अँग्रोकेमिकल्स्, पॉलिमर्स्, कॉस्मेटिकस्, पेंटस्, ऑईलस्, सोपस्, डीटरजन्टस्  इत्यादीचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. नोकरीच्या चांगल्या संधी प्राप्त व्हाव्यात म्हणून या अभ्यासक्रमात ऑरगॅनिक केमिस्ट्रीवर जास्त भर दिला जातो. समयोचित अभ्यासक्रम असल्याने आणि प्रात्यक्षिक व प्रकल्प यावर भर असल्याने या अभ्यासक्रमाला अधिक पसंती दिली जाते.

ऑरगॅनिक रसायन शास्त्र विभाग: या विभागाचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना शैक्षेणिक तसेच औदेगिक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारा असून, नेट / सेट पेरीक्षांच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. या विभागाने संशोधन व कुशल मनुष्य बळ निर्मातीमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे.  

फिजीकल केमिस्ट्री विभागफिजिकल केमिस्ट्री विषयातील कुशल मनुष्यबळ तयार करणे हा या विषयाचा मूळ उद्देश आहे . मॉलीक्युलर रिकग्नीशन, मॉलिक्युलर ट्रान्सपोर्ट, मॉलिक्युलर आयन बाईंडींग इक्वीलिबीया आणि मॉलिक्युलर सिम्युलेशन विशेषतः बायो पॉलिमर इन अॅ्क्वेयस सोल्युशनशी संबंधीत संशोधन प्रा. के. जे. पाटील आणि डॉ. के. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 

ऍनालिटीकल केमिस्ट्री विभाग :या विभागाचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने विविध कंपन्या, प्रयोगशाळा व संस्थांच्या आजच्या गरजा व मागण्यांवर आधारित आहे.  मूलभूत ज्ञानासोबतच प्रतिष्ठित उपकरणांसह दिल्या जाणारे व्यावहारिक प्रशिक्षण विभागाकडून दिले जाते. राष्ट्रीय प्रगतीसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याची क्षमता हया अभ्यासक्रमात आहे.Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon