Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
पूज्य साने गुरुजी
Minimize
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

श्री. सुनील पाटील
केंद्र प्रमुख (I/C)

जनसंपर्क अधिकारी,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्र
Minimize

कोकण हि जन्मभूमी असूनही खान्देश हि कर्मभूमी मानलेल्या साने गुरुजींच्या जीवन विचार संस्कारांचा प्रभाव महाराष्ट्रातील गत तीन पिढ्यांवर राहिला आहे. अशा साने गुरुजींच्या संस्कारांचे केंद्र खान्देश हे कार्यक्षेत्र असलेल्या “उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात” स्थापन व्हावे अशी तमाम साने गुरुजीप्रेमिंची आग्रही मागणी होती आणि त्यानुसार २४ सप्टेंबर १९९७ रोजी ‘पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राची’ स्थापना करण्यात आली.

सानेगुरुजींचा जीवन प्रवास
Minimize

नाव:- पांडुरंग सदाशिव साने
जन्म:- २४ डीसेंबर १८९९, पालघर ,ता. दापोली, जी. रत्नागिरी
शिक्षण:- एम.ए. (मराठी,इंग्रजी,संस्कृत) उत्तीर्ण

शिक्षक कारकीर्द :-

 • १७ जून १९२४ : खान्देश एज्यूकेशन सोसायटीच्या हायस्कूल मध्ये(सध्याचे प्रताप हायस्कूल) शिक्षक.
 • १९२५ ते १९३० : संस्कारक्षम व राष्ट्रीय वृत्तीने धडपडणाऱ्यासाठी विविध माननीयांचे चरित्र लेखन केले.
 • २९ एप्रिल १९३० : कायदेभंग चळवळीत भाग घेण्यासाठी शाळा सोडली.
 • १९३१  : पुन्हा शाळेत दाखल.

चळवळीतील सहभाग :-

 • खान्देशात सत्याग्रह व कायदेभंग चळवळीचा प्रचार. अमळने येथे अटक,प्रारंभी धुळे व नंतर त्रीचनापाल्लीच्या तुरुंगात. एकूण ११ महिने कारावास. आंतरभरतीची कल्पना या तुरुंगात सुचली.
 • १९३१- अमळनेर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड.
 • १७ जानेवारी १९३१ ते ऑक्टोबर १९३३ –अमळनेर येथील सभेनंतर अटक. दोन वर्षाचा कारावास. धुळे येथील तुरुंगात अचार्य विनोबा भावे यांचा सहवास. विनोबांच्या गीता प्रवचनाचे श्रुतलेखन.
 • ऑगस्ट १९३२ –धुळ्याहून नाशिक तुरुंगात रवानगी. नाशिक तुरुंगात‘श्यामची आई’,‘धडपडणारी मुले’ आदी प्रसिद्ध पुस्तकांचे लेखन.एकूण कारावास २२ महिने.
 • २६ जानेवारी १९३४- वैयक्तिक सत्याग्रहात भाग व चाळीसगाव येथे अटक. धुळे येथील तुरुंगात चार महिन्याची शिक्षा. सुटकेनंतर पुण्यात तीन महिने वास्तव्य. यावेळी ‘श्यामची आई’ मधील शेवटच्या ९ रात्री (३७ ते ४५) लिहिल्या.
 • १९३७ पासून खान्देशातील शेतकरी, कामगारांसाठी कार्य.
 • १९४२ च्या लढ्यात मुंबईहून भूमिगत कार्य. १८ एप्रिल १९४३ ते १५ जानेवारी १९४५ कारावास.
 • २४ डिसेंबर १९४६ –पुणे येथील कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 • १ मे १९४७ ते १० मे १९४७ –पंढरपूर मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी दहा दिवसांचे उपोषण.
 • १ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी १९४८- महात्मा गांधीच्या हत्येचे प्रायश्चित्त म्हणून गुरुजींचे २१ दिवसांचे उपोषण.
 • १५ ऑगस्ट १९४८ –साधना साप्ताहिक सुरु.
 • मे- जून १९४८ -  गुरुजींचा कर्नाटक दौरा. आंतरभारतीच्या कार्याचा प्रसार.
 • मृत्यू - ११ जून १९५०.
आवाहन
Minimize

पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्रांअंतर्गत साने गुरुजींच्या सर्व आठवणी गोळा करून गुरुजींचे वास्तव्य असलेल्या प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे साने गुरुजींचे एक स्मारक कक्ष उभारण्याचे कार्य हाती घेतलेले आहे जेणे करून भारतातील कोणाही व्यक्तीला साने गुरुजी संबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास त्यांना एकत्रित रीत्या त्यांचे साहित्य उपलब्ध व्हावे,त्यांचे विचार वाचावयास, पहावयास मिळावे, त्यांच्याविषयी अभ्यास करता यावा, गुरुजींच्या विचारांनी प्रेरित होऊन हे विचार रुजविण्यास सज्ज व्हावे हा या मागचा उद्देश आहे.

आपण सर्वाना पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने आवाहन करीत आहोत कि, आपणास साने गुरुजींशी निगडीत काही माहिती, साने गुरुजींच्या सहवासातील व्यक्ती, साने गुरुजी विचारांचे समर्थक,साने गुरुजींचे दुर्मिळ साहित्य, साने गुरुजी विशेषांक, त्यांच्या विचारांशी निगडीत साप्ताहिके,मासिके,दुर्मिळ लेख,साने गुरुजींनी लिहिलेली पत्रे,साने गुरुजींवर इतरांनी लिहिलेले लेख,जुनी वृत्तपत्रातील बातम्या आदी संबंधीची माहिती असल्यास,संस्कार केंद्रास मिळवून देण्यास सहकार्य करावे. अथवा यासंबंधी आम्हाला कळवावे,ते मिळवण्याचे आम्ही शर्थीने प्रयत्न करू.या सहकार्याच्या निमित्ताने साने गुरुजी संस्कार केंद्राचे कार्य वृद्धीगंत करण्यास आपण खारीचा वाट उचलून केंद्राच्या कार्यास सहकार्य करू शकता.

Last Updated :- July 2014

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon