Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
संशोधन आणि विकास विभागाचे कार्यस्वरूप
Minimize
  • विद्यापीठाच्या भौतिक आणि शैक्षणिक अशा दोन्ही प्रकारच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी संशोधन आणि विकास विभागाची आहे. शिवाय विद्यापीठाचे विभाग, संस्था, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्था यांचे शैक्षणिक मूल्यांकन करणे या विभागाचे काम आहे. पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रम यांचे नियोजन, निरीक्षण, समन्वय आणि त्यांना मार्गदर्शन आणि संलग्नित महाविद्यालयांचा विकास देखील हा विभाग करीत आहे.
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था, उद्योग, व्यवसाय आणि व्यावसायिक संघटना यांच्याशी हा विभाग सक्रीय भागीदारी प्रस्थापित करेल.
  • आंतरविद्यापीठीय विशिष्ट योजना विकसित करण्यासाठी आणि सहसंबंध निर्माण करण्यासाठी तसेच विद्यापीठ व महाविद्यालये यांचा उद्योग, कृषी, बँका, व्यापार आणि समाज यांच्याशी संवाद प्रस्थापित करण्यासाठी हा विभाग उपाय सुचवेल.
  • कायद्यात नमूद केल्यानुसार विद्यापीठाची उद्दिष्ट्ये लक्षात घेऊन आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक धोरणांची योग्य दखल घेऊन कमी कालावधी व  दीर्घ कालावधी असे दोन्ही प्रकारचे विद्यापीठ व महाविद्यालये यांचे वस्तुस्थितीदर्शक विकास आराखडे हा विभाग तयार करेल.
  • विभाग, महाविद्यालये आणि विद्यापीठ यांचा विकास आणि सहकार्यपूर्ण कार्यक्रम यांची व्यवस्थापन परिषदेस शिफारस हा विभाग करेल.
  • अशा मान्यताप्राप्त सर्व विकास आणि सहकार्यपूर्ण कार्यक्रमांचे निरीक्षण आणि त्यांच्या प्रगतीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेस हा विभाग सादर करेल.
  • विद्यापीठ विभाग, पदव्युत्तर केंद्रे आणि महाविद्यालये यांनी प्रकल्पांच्या विकासासाठी खर्च केलेल्या अनुदानाचे मूल्यमापन आणि विश्लेषण करुन त्याबाबतचा अहवाल विद्या परिषदेस हा विभाग सादर करेल.
  • वाणिज्य, उद्योग, सामाजिक सेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील प्रशिक्षित व्यक्तींच्या आवश्यक मनुष्यबळाचे हा विभाग मूल्यांकन करेल आणि संबंधित अभ्यासक्रमांची ओळख करुन देणेबाबत आणि त्यांचे सक्षमीकरण करणेबाबत आवश्यक शिफारसी विद्यापरिषदेला करेल.
  • विद्यापीठ, संस्था वा विभाग, पदव्युत्तर केंद्रे आणि महाविद्यालये यांच्या संयुक्त अभ्यासक्रमांचे आणि विकासाचे शैक्षणिक मूल्यांकन करण्याची व्यवस्था परिनियमांमधील तरतुदींनुसार तीन वर्षांतून कमीत कमी एकदा हा विभाग करेल आणि अंमलबजावणीकरीता विद्यापीठास आवश्यक शिफारसी करेल.
  • विद्यापीठाशी संलग्नित होणारी नवीन महाविद्यालये किंवा संस्था यांच्या स्थापनेसंबंधीच्या अर्जांची छाननी हा विभाग करेल आणि परिनियमांमधील  तरतुदींनुसार राज्यशासनाकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवेल.

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon