Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
संलग्नता विभाग
Minimize

संलग्नता विभागाविषयी

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ च्या विभाग ८१ ते ९२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे नवीन महाविद्यालये/मान्यताप्राप्त संस्था स्थापन करण्याची भावी योजना तयार करणे आणि नवीन महाविद्यालये/मान्यताप्राप्त संस्था यांना संलग्नता प्रदान करणे, संलग्नतेचा कालावधी वाढविणे, कायमस्वरुपी संलग्नता देणे, नैसर्गिक विकास आणि संलग्नता पुढे चालू राहण्यासंबंधी मान्यता देणे या बाबींशी संलग्नता विभागाचा संबंध येतो.

शैक्षणिक वर्ष २०११-१२ पासून नवीन महाविद्यालये/मान्यताप्राप्त संस्था यांना संलग्नता देणे आणि विद्यमान महाविद्यालये/मान्यताप्राप्त संस्था यांच्या संलग्नीकरणास मुदतवाढ देणे याबाबतची प्रक्रिया सुधारित करण्यात आली असून आणि महाराष्ट्र शासनाच्या दि.३० ऑक्टोबर, २०१० च्या ठराव क्र. एनजीसी २०१०/(१९३/१०) माशी ४ अनुसार नवीन प्रक्रीया निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन महाविद्यालये/मान्यताप्राप्त संस्था यांना संलग्नतेसाठी अर्ज मागविण्यासाठीचे आणि मुदतवाढ मिळविण्यासाठीचे अर्ज मागविण्यासंबंधीच्या काही निकषांमध्ये सुधारणा केली आहे आणि एनजीसी २०११/(२४०/११) / माशि ४, दि.२५ ऑक्टोबर, २०११ हा ठराव जारी केलेला आहे.

संलग्नित महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था आणि संशोधन संस्था यांची संख्यात्मक माहिती (आकडेवारी) :

विद्याशाखा

महाविद्यालयांची  संख्या

कला, विज्ञान व वाणिज्य

१००

ललितकला

०४

विधी

०६

सामाजिक कार्य

०५

अभियांत्रिकी व वास्तुनिर्माणशास्त्र

२०

औषधीनिर्माण

१४

शिक्षणशास्त्र

४१

मान्यताप्राप्त संस्था

२७

शासन अनुदानित महाविद्यालये

८३

स्वयं अनुदानित महाविद्यालये

१३४

संलग्नित महाविद्यालयांत चालविली जाणारी पदव्युत्तर केंद्रे

७३


संलग्नता विभागाने आचरणात आणलेल्या नावीन्यपूर्ण बाबी :

 1. विद्यापीठ संकेतस्थळावर महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था यांना संलग्नता मंजूर केल्यास प्रदर्शित करणे.
 2. विद्यापीठ संकेतस्थळावर विभागाशी संबंधित सर्व आवश्यक अर्जाचे नमुने, शासकीय पत्रे, शासकीय ठराव प्रदर्शित करणे.
 3. नवीन महाविद्यालये, संलग्नतेच मुदतवाढ, नैसर्गिक वाढ, कायम स्वरुपी संलग्नता आणि संलग्नतेचे नूतनीकरण या संबंधीचे सर्व अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जातात.
 4. विविध समितींचे LIC अहवाल विद्यापीठ संकेतस्थळावर प्रदर्शित करणे.

गुणवत्ता उद्दिष्ट्ये :

 1. सर्व महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांना ऑनलाईन संलग्नीकरण.
 2. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण प्रदान करणेसाठी विद्यापीठाच्या वस्तुस्थितीनिदर्शक आराखड्यात विशेष तरतुदी करणे.

संलग्नता मान्यतेसाठी प्रक्रिया :

 [अ] नवीन महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यमान संलग्नित महाविद्यालयाचे व मान्यता प्राप्त संस्था यांना मुदतवाढ

 1. नवीन महाविद्यालये / संस्था संलग्नीकरण व संलग्नीकरणाची मुदतवाढ यासाठी प्रस्ताव मागविणेसाठी जाहिरात प्रसिध्द करणे.
 2. येणाऱ्या वर्षासाठी ३१ ऑक्टोबरपूर्वी प्रस्ताव स्वीकारणे.
 3. १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज व अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे यांची छाननी.
 4. ३० नोव्हेंबर पर्यंत संबंधित संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह अपूर्णतेची (विसंगतीची) केलेली पूर्तता.
 5. १५ फेब्रुवारी पर्यंत पात्र संस्था / महाविद्यालये/मान्यताप्राप्त संस्था यांना तज्ज्ञ समितीची भेट आणि विद्यापीठास अहवाल सादर.
 6. २५ फेब्रुवारी पूर्वी मा. कुलगुरुंव्दारा प्रस्तावांच्या पात्रतेसंबंधी निर्णय.
 7. १५ मार्च पूर्वी संबंधित संस्था/महाविद्यालये/मान्यताप्राप्त संस्था यांचेकडून मा. कुलगुरूंच्या निर्णयाला आव्हान.
 8. १५ एप्रिलपूर्वी आव्हानांवर मा. कुलगुरूंचा निर्णय.
 9. १ मे, पर्यंत पात्र अर्ज विद्यापीठाकडून महाराष्ट्र राज्य शासनाकडे जमा.
 10. १५ जून पर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाची प्रस्तावांना मान्यता.
 11. राज्य शासनाने मंजूर केलेल्या नवीन महाविद्यालये/संस्था यांना प्रथम संलग्नीकरण आणि विद्यमान महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था यांना मुदतवाढ.

[ब] संलग्नित महाविद्यालये/मान्यताप्राप्त संस्था यांना नैसर्गिक वाढ :

 1. येणाऱ्या वर्षासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव स्वीकारणे.
 2. अर्ज व अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे यांची विद्यापीठ व महाविद्यालये विकास मंडळाकडून छाननी
 3. बी.सी.यु.डी.च्या व्यवस्थापन परिषदेस शिफारशी.
 4. व्यवस्थापन परिषदेच्या महाराष्ट्र राज्य शासनास शिफारशी.
 5. ३१ डिसेंबर पूर्वी व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीसह प्रस्ताव राज्य शासनास जमा करणे.
 6. महाराष्ट्र राज्य शासनाव्दारा प्रस्तावाला मान्यता.
 7. संलग्नित महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था यांना विद्यापीठाकडून संलग्नता.

[क] संलग्नित महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था यांना कायमस्वरुपी संलग्नता :

 1. येणाऱ्या वर्षाच्या ३१ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव स्वीकारणे.
 2. अर्ज व अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे यांची बी.सी.यु.डी. कडून छाननी.
 3. बी.सी.यु.डी. च्या विद्यापरिषदेस शिफारशी.
 4. स्थानिक तपासणी समितीची नेमणूक
 5. विद्यापरिषदेस स्थानिक तपासणी समितीने अहवाल सादर करणे.
 6. विद्यापरिषदेचा निर्णय आणि महाविद्यालय/मान्यताप्राप्त संस्था यांना कायमस्वरुपी संलग्नता.

[ड] संलग्नित महाविद्यालयांच्या संलग्नतेचे सातत्य :

 1. येणाऱ्या वर्षाच्या ३१ ऑक्टोबर पर्यंत (विद्यापीठ कायदा १७२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विलंब शुल्कासह) प्रस्ताव स्वीकारणे.
 2. निरनिराळया स्थानिक तपासणी समित्यांची नेमणूक
 3. विद्यापरिषदेस स्थानिक तपासणी समिती अहवाल सादर करणे.
 4. विद्यापरिषदेचा निर्णय आणि महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था यांना संलग्नता.
Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon