Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
ग्रंथपाल
Minimize

ग्रंथपाल

 

M. A. (Sociology).,
M.Lib. andI.Sc.; Ph. D.
विद्यापीठ ग्रंथपाल म्हणून डॉ. टी. आर. बोरसे  हे काम पहात आहेत. त्यांना ग्रंथालय शास्त्रतंत्र आणि ग्रंथालय आस्थापना विषयातील एकूण 30 वर्षांचा अनुभव असून, त्यांनी कृषीतंत्र माहिती निर्मिती, माहिती श्रोतांचा शोध, ग्रामविकास अधिकारींची विकासात्मक भूमिका, परिसर जागरुकता, माहिती संदेश वहन आणि डिजीटल ग्रंथालय व त्या ग्रंथालयाची भूमिका  इत्यादी विषयावर काम केले आहे. अनेक शैक्षणिक कार्यांमध्ये त्यांचे योगदान आहे. ग्रंथपाल डॉ. टी. आर. बोरसे यांनी स्वत: पुढाकार घेऊन विद्यापीठाच्या सहकार्याने विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग स्थापन करुन चांगले प्रशिक्षित ग्रंथपाल विद्यापीठ परिक्षेत्रात  तयार केले आहेत. माहिती विस्तार शिक्षण ही संकल्पना त्यांनी प्रथमत: ग्रंथालया मार्फत राबविली आहे. त्यासाठी त्यांनी तसे स्वतंत्र मॉडेल तयार केले आहे. भारतीय व भारता बाहेरील आंतरराष्ट्रीय बुक बँके सारख्या अनेक संस्था व व्यक्तींकडून त्यांनी पुस्तकांच्या स्वरुपात देणग्या घेऊन विद्यापीठ ग्रंथालय समृध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमध्ये निबंध सादर केलेले आहेत, तसेच त्यांनी अनेक अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊन तांत्रिक कार्य प्रणालीत अध्यक्ष म्हणून कामे केली आहे. डॉ. टी. आर. बोरसे ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयांत Ph.D. साठी मार्गदर्शक म्हणून सुध्दा काम करत आहेत.

उपग्रंथपाल


M. A. ( Economics )., MLISc., Ph. D.
विद्यापीठाचे उपग्रंथपाल म्हणून डॉ. अनिल नानाजी चिकाटे हे काम पहात असून त्यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील 25 वर्षांचा अनुभव आहे. राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकांमध्ये त्यांचे एकूण 15 संशोधित शोधनिबंध प्रकाशशित असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीन परिषदा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्तरावरील 20 परिषदांमधून त्यांनी आपल्या संशोधीत शोधनिबंधांचे वाचन केलेले आहे व ते शोधनिबंध प्रकाशीतही झाले आहेत. अलिकडेच मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय परिषदेस त्यांनी शोधनिबंध सादर केलेला आहे. युजीसी व एआयसीटीई संस्थेने पुरस्कृत केलेल्या परिषदा, कार्यशाळा आणि रिफ्रेशर कोर्स अशा अनेकविध कार्यक्रमांत त्यांनी तज्ञ म्हणून व्याख्याने दिलेली आहेत.
     नागपूर विद्यापीठ ग्रंथालय संघाद्वारे देण्यात येणारा महत्वपूर्ण पुरस्कार म्हणजे  ' बेस्ट लायब्ररीयन ' च्या सन्मानाचे 2008 सालचे ते मानकरी ठरले आहेत.

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठात ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयाचे ते पीएच. डी. चे मार्गदर्शक असून सध्या 05 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत आहेत. 10 एम. फिल व 35 एम. एल. आय. एस. सी. च्या लघुप्रबंध (डेझरटेशन) करीता त्यांनी यशस्वी मार्गदर्शन केले आहे. युजीसी च्या एम. आर. पी. अंतर्गत त्यांचे संशोधन सुरु आहे. आय. ए.;व्ही. एल. ए.; मुक्ला; लिसा; एआयएसएमएलए; बहुटा इ. ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील संघटनांचे ते आजीव सभासद आहेत.

सहाय्यक ग्रंथपाल

 
Mr. Vijay Aher
B. Com, MLISC, NET

सहाय्यक ग्रंथपाल म्हणून श्री. विजय डी. आहेर हे सन 2007 पासून काम पहात असून त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी पुणे विद्यापीठातुन प्राप्त केलेली आहे. तसेच त्यांनी सन 2006 मध्ये नेट परिक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना ग्रंथालयातील एकुण 5 वर्षांचा अनुभव आहे. याच कालावधीत त्यांनी माहितीशास्त्रज्ञ पदाचा अतिरिक्त कार्यभार एक वर्षभर सांभाळला असून त्यांनी या विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागात 3 वर्षे अंशकालीन अधिव्याख्याता म्हणूनही काम सांभाळले आहे.


माहिती शास्त्रज्ञ
 
Miss. Neelima T. Mhaske
M. Sc. (Computer Science), SET

माहिती शास्त्रज्ञ म्हणून कु. निलीमा तुळशिराम म्हस्के ह्या सन 2008 पासून मध्यवर्ती ग्रंथालयात कार्यरत आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी एमएससी (संगणक शास्त्र) ही पदवी प्राप्त केली असून या विद्यापीठाच्या संगणक शास्त्र विभागात अंशदायी अधिव्याख्याता म्हणून 3 वर्ष काम पाहिलेले आहे. तसेच त्यांनी सेट (संगणक शास्त्र) ही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहे. डीजीटल लायब्ररी आणि इन्फॉरर्मेशन रिट्रायव्हल हा त्यांचा आवडीचा विषय आहे. तसेच ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागात अंशदायी अधिव्याख्याता म्हणून 4 वर्षांपासून या काम पहात आहेत.

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon