Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
प्रवेश आणि पात्रता
Minimize

प्रवेश :- 
सर्व अभ्यासक्रमांना गुणवत्तेनुसार व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयासाठी असलेल्या राज्यशासनाच्या आरक्षण नियमानुसार प्रवेश देण्यासंदर्भात कार्यवाही करणे.

पात्रता :- 

१. दरवर्षी महाविद्यालयांना पात्रता नियमासंबधीचे परिपत्रक निर्गमित करणे.

२. संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठीय विभाग व प्रशाळा यांचेकडून पात्रता अर्ज व पात्रता याद्या स्वीकारून त्यांची पडताळणी करणे, पात्रता प्रमाणपत्र देणे. यासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे पात्रते संबंधित आवश्यक ती कागदपत्रे संलग्नित महाविद्यालये प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थांचे  संचालक, विद्यापीठ विभाग व प्रशाळा यांचे प्रमुख यांनी मुदतीच्या आत या विभागात सादर करणे आवश्यक आहे.

"पात्रता प्रमाणपत्र" हे विद्यार्थ्याला संलग्नित महाविद्यालय अथवा मान्यताप्राप्त संस्था यातील निवडलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशास प्राप्त असल्यासंबधीचे पहिले प्रमाणपत्र आहे. पात्रता प्रमाणपत्र शक्य तितक्या लवकर दिले जाणे ही बाब विद्यार्थी तसेच विद्यापीठाच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्यास अथवा काही कारणाने विलंब झाल्यास विद्यार्थी व संबधीत सर्वांनाच याची झळ पोहचते. विद्यार्थ्याने खर्च केलेला पैसा व त्याची मौल्यवान वर्ष यांचा अपव्यय होतो. असे प्रकार होवू नयेत वा त्यांचे प्रमाण कमीतकमी असावे, यासाठी पात्रतेची प्रक्रिया काळजीपूर्वक व तत्परतेने करणे गरजेचे असते. यासाठी संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य, मान्यता संस्थाचे संचालक, विद्यापीठीय विभाग व प्रशाळा प्रमुख यांनी खाली दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. पात्रतेसंबधीचे अटी व नियम पात्रता अर्ज सादर करण्याच्या तारखा व पात्रता शुल्क व इतर तपशीलासाठी येथे क्लिक करा.  अधिक परीपत्रकांसाठी येथे क्लिक करा.

सूचना:- यासंबधी अधिक माहितीसाठी पात्रता विभागाचे उपकुलसचिव वा सहायक कुलसचिव यांचेशी खालील दूरध्वनीवर संपर्क साधावा.

१. उपकुलसचिव, प्रवेश पात्रता विभाग (०२५७)२२५७२९१ 

२ . सहायक कुलसचिव, प्रवेश पात्रता विभाग (०२५७)२२५७२९२

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon