Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
जनसंपर्क विभाग
Minimize

जनसंपर्क विभागाची स्थापना 1995 साली झाली. सध्या श्री. सुनिल पाटील, हे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या विभागाचे मुख्य काम जनमानसात विद्यापीठाची यथोचित प्रतिमा निर्माण करण्याचे आहे. या विभागातर्फे विद्यापीठात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहीती देणाऱ्या बातम्या आणि छायाचित्रे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीसाठी पाठविण्यात येतात. जनसंपर्क विभागातर्फे माहिती आणि लेखही प्रसारित केले जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यागतांसाठी चौकशी सेवा पुरवली जाते. या विभागात वृत्तपत्रांतील विद्यापीठविषयक बातम्यांचे संकलन केले जाते व प्रत्यक्ष बातम्या आणि त्यांच्या डीजीटल कॉपी देखील ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे गरजेनुसार पत्रकार परिषद आयोजित करण्याची जबाबदारी देखील या विभागाकडे असते. हा विभाग, विद्यापीठ, प्रसारमाध्यमे आणि समाज यात समन्वयाचे काम करीत असतो. मा. कुलगुरु महोदयांच्या दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक विद्यापीठाच्या डिस्प्ले युनीट कार्यपध्दतीद्वारा सादर केले जाते. या विभागातर्फे विविध प्रकारच्या जाहिराती वृत्तपत्रांना पाठविण्यात येतात. या दैनंदिन कामकाजाबरोबरच विस्तारित कार्यक्रमांचा भाग म्हणून दरवर्षी 16 व्याख्यानमाला आयोजित करण्यात येतात. या विभागातर्फे वार्षिक अहवाल, वार्षिक दैनंदिनी, विद्यापीठ माहितीपत्रक तयार करण्यात येते. विभागातर्फे विद्यापीठाचे नियतकालिक 'उत्तमविद्या', 'युवास्पंदन' प्रकाशित केल्या जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठीचे वार्षिक नियतकालिक 'गिरणांगण' तयार करण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडीत असतो. या विभागाचे 75  आसनक्षमता असलेले वातानुकूलित दृकश्राव्य सभागृह आहे, जे विविध प्रकारच्या बैठका, चर्चासत्र, परिषदा, कार्यशाळा अशा विद्यापीठाच्या उपक्रमांसाठी उपलब्ध करुन देण्यात येते. या विभागाने विद्यापीठाची ध्वनिचित्रफीत (Video Documentary) तयार केली आहे. जी दृकश्राव्य सभागृहात विद्यार्थ्यांना आणि अभ्यागतांना दाखविली जाते.

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon