Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
कायदा/आर.टी.आय. विभाग
Minimize

विद्यापीठात सन १९९६ मध्ये स्वतंत्ररित्या कायदा विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या विभागाकडून कायदेशीर प्रकरणांशी निगडीत संपूर्ण कामकाज तत्परतेने हाताळले जात आहे. हा विभाग उपकुलसचिव, (विधी/माहितीचा अधिकार) यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. या विभागाची कामकाजाची विभागणी खालीलप्रमाणे आहे.

 • न्यायालीन प्रकरणे:-

  या विभागामार्फत न्यायालीन प्रकरणे स्वीकारण्यापासून निकालापर्यंत कार्यवाही केली जाते. मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय, न्यायाधिकरण, मे. राष्ट्रीय ग्राहक निवारण मंच, राज्य ग्राहक मंच, जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कामगार न्यायालये, औद्योगिक न्यायालये, महसुल आयुक्त इत्यादी ठिकाणी न्यायालीन प्रकरणे दाखल केली जातात. या व्यतिरिक्त शपथपत्र तयार करणे, न्यायालयात हजर राहणे इत्यादी कामे ही केली जातात. प्रामुख्याने जमिन, बांधकाम लवाद, संलग्नता, व्याख्याता मान्यता, विद्यापीठ प्रशासन, परीक्षा, जात पडताळणी, प्रवेश व पात्रता, ग्राहक मंच, तक्रार निवारण, फौजदारी गुन्हे, वित्तीय बाबी इत्यादी संदर्भात न्यायालीन प्रकरणांवर कार्यवाही या विभागामार्फत केली जाते.

 • कायदेशीर अभिप्राय :-

  उपकुलसचिव (विधी/माहितीचा अधिकार) हे विविध अधिकार मंडळांच्या तसेच विद्यापीठातील विभागांच्या गरजेनुसार प्राप्त प्रकरणांवर कायदेशीर अभिप्राय देतात.

 • विभागीय चौकशी :-

  विभागीय चौकशी करण्याचे संपूर्ण कामकाज या विभागाद्वारे हाताळले जाते. याशिवाय इतर विभागांना देखील या संबंधी मार्गदर्शन केले जाते. उपकुलसचिव (विधी/माहितीचा अधिकार) हे अनेक चौकशी समिती मध्ये सादरकर्ता अधिकारी म्हणून कार्य करतात.

 • माहिती अधिकार कक्ष (RTI Cell) :-
  • अर्ज :-

   या विभागामार्फत माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत सर्व प्रकारचे अर्ज स्वीकारले जातात व त्यावर कार्यवाही केली जाते, विद्यापीठातील माहिती अधिकारी यांना मार्गदर्शन करणे, अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देणे, तसेच वेळोवेळी शासनाला व इतर प्राधिकरणांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्याचे कामही या विभागामार्फत केले जाते.

  • प्रथम अपील-

   माहिती अधिकारीविरूध्द दाखल अपील स्वीकारणे, पत्रव्यवहार करणे, सुनावणी आयोजित करणे हे ही काम या विभागामार्फत केले जाते.

  • व्दितीयअपील:-

   राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखलअपील स्वीकारणे, आवश्यक ती माहिती गोळा करणे, बाजू मांडणे, विद्यापीठाचेम्हणणेतयार करणे, सुनावणीस हजर राहून माहिती सादर करणे.

 • समित्या :-

  या विभागाला अनेक समित्यांमार्फत कामे करण्यासाठी दिली जातात,आणि त्यानुसार या समित्यांची कामे विभागामार्फत हाताळली जातात.

 • उच्च दर्जाचे पत्रव्यवहार :-

  केंद्र शासन, राज्य शासन, राज्यपाल कार्यालय, सर्वोच्य परिषद, मानव अधिकार आयोग,  अपंग आयोग, महसुल आयुक्त, कामगार आयुक्त, विधी आयुक्त, राष्ट्रीय महिला आयोग इत्यादी उच्चस्तरावरील पत्रव्यवहार व इतर कार्यवाही मा.कुलगुरू महोदयाच्या निर्देशानुसार केले जाते.

 • नियमांचे मसुदे :-

  सर्व प्रकारचे नियम, विनियम, अध्यादेश, परिनियम, निर्देश व इतर महत्त्वपूर्ण अधिसूचना विद्यापीठ कायद्यानुसार तयार करणे, आणि त्यास आवश्यकतेनुसार विविध प्राधिकरणे आणि मा. राज्यपाल कार्यालय तसेच शासनाकडून मान्यता घेणे.

 • अधिकारी/कर्मचार्‍यांच्या तक्रारी :-

  विद्यापीठातील अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून प्राप्त तक्रारींवर मा. कुलगुरू महोदयांच्या आदेशानुसार कार्यवाही करणे, सुनावणी घेणे, निकाल कळविणे इत्यादी.

 • करारपत्रे

  विद्यापीठातर्फे देश/विदेशातील विविध संस्था व विद्यापीठे यांचाशीहोणारे सामंजस्यकरारपत्रांचा मसूदा तयार करणे व तपासून देणे.

 • पोलीस यंत्रणेशी निगडीत पत्रव्यवहार :-

  या विभागामार्फत विद्यापीठाशी संबंधित कामकाजा संदर्भात आवश्यक त्या वेळी पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून सर्व प्रकारची कार्यवाही करणे,पत्रव्यवहारकरणे.

 • घर कर्जासाठीचे प्रस्ताव :-

  घर कर्जासाठी आलेल्या प्रस्तावाचे कायदेशीर पद्धतीने छाननी करण्याचे काम या विभागामार्फत केले जाते.

 • विविध बिल :-

  विविध कंत्राटदाराकडून आलेली बिले हि कायदेशीर गरजांची पूर्तता करणारी आहेत का याची छाननी या विभागामार्फात केली जाते.

 • उत्तम आचरण :-
  • खर्च अर्थव्यवस्था

   शक्य त्या ठिकाणी वाजवीचा खर्च कमी केला जातो आणि खर्चाचा तपशील सादर केला जातो.

  • अनादर टाळणे :-

   विद्यापीठाच्या कोणत्याही विभागामार्फत न्यायालयाचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली जाते. न्यायालाच्या आदेशाचे पालन होण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जातो.

  • पाठपुरावा करणे :-

   भागभांडवल - धारकांचा सतत पाठपुरावा घेऊन विनाविलंब कारवाई घेतली जाते.

  • वैयक्तिक उपस्थिती :-

   महत्वाच्या मुद्यांमध्ये एक वैयक्तिक उपस्थिती देऊन प्रभावी पणे काम करते.

R.T.I. हस्तपुस्तिका

दृष्टीक्षेपात कोर्ट केसेस व R.T.I. ची माहीती

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon