Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
एस.सी./एस.टी. कक्ष
Minimize

या विभागाची स्थापना 17 जानेवारी, 2002 साली झाली. सध्या श्री.वाय.डी. वाघमारे या विभागाचे उपकुलसचिव म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

अधिकारी/कर्मचारी वर्ग 

अ.क्र. अधिकारी / कर्मचा-यांचे नाव पदनाम
०१ डॉ. आर. जे वळवी उप कुलसचिव (अधिक कार्यभार)
०२   श्री. द. बी. बागले कक्षाधिकारी
०३   श्री. जी. डब्लू. सावले लघुलेखक (नि.श्रे.)
०४   श्रीमती. भारती बी. भावसार   सहाय्यक
०५   श्री.योगेश ह. राठोड
शिपाई
अनुसूचित जाती / जमाती कक्षाची वैशिष्ट्ये :
 • विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील अनुसूचित जाती, जमाती व्ही.जे., एन.टी., इतर मागासवर्गीय आणि विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण धोरण राबविणे.
 • अनुसूचित जाती, जमाती, व्ही.जे.एन.टी., इतर मागासवर्गीय आणि विशेष मागासवर्गीय उमेदवारांची नोंदणी करणे आणि अधिव्याख्याता पदासाठी पात्र उमेदवारांची यादी बनविणे.
 • संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या अनुशेषाची माहिती संकलित करुन ती वेळोवेळी महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविणे.
 • संलग्नित महाविद्यालयात शासनाच्या नियमाप्रमाणे रोस्टर सांभाळले जाते आहे याची पडताळणी करणे.
 • संलग्नित महाविद्यालयात मुलाखतींच्यावेळी अनुसूचित जाती जमाती, व्ही.जे.एन.टी., इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय पात्र उमेदवारांची यादी पाठविणे.
 • मागासवर्गीय कक्ष विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक पदांच्या अनुशेषाचे निरीक्षण करणे.
 • या विभागातर्फे अनुसूचित जाती, जमाती, व्ही.जे.एन.टी., इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय उमेदवारांच्या तक्रार निवारणाचे कार्य केले जाते.
 • या हेतुप्रित्यर्थ राज्यशासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमून दिलेल्या उदिष्ट्यांची पूर्तता करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्यात येतो.
 • आरक्षण धोरणाचे विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवर अंमलबजावणी , मॉनिटर आणि नियमित मूल्यमापन करणे आणि राज्य सरकार व युजीसीच्या कार्यक्रम सुनिश्चितीसाठी प्रभावी धोरनाची अंमलबजावणी करणे.
अनुसूचित जाती जमाती कक्षाचे कार्य :
 1. राज्यशासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्णय/प्रसार करणे आणि दरवर्षी वेगवगळ्या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठात प्रवेशित अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची माहिती विशिष्ट वेळात विहीत नमुन्यात गोळा करणे आणि गरजेनुसार त्याबरहुकुम कारवाई करणे.
 2. राज्यशासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्णय / प्रसार करणे आणि विद्यापीठात व महाविद्यालयात अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांच्या नेमणुका, प्रशिक्षण आणि शिक्षक व शिक्षकेतर पद याची माहिती निश्चित वेळात आणि विहीत नमुन्यात गोळा करणे आणि गरजेनुसार त्याबरहुकूम कारवाई करणे.
 3. राज्यशासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुसूचित जाती जमातीच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि नोकऱ्यांसाठी असलेल्या विविध धोरणांची पुर्नरचना आणि विकास करण्यासाठी अहवाल आणि माहिती गोळा करणे.
 4. वरीलप्रमाणे गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करणे आणि त्यासंबंधीचा अहवाल आणि गरजेनुसार विद्यापीठ अनुदान आयोग, मानव संसाधन मंत्रालय यांच्या पुढील प्रसारणासाठी त्या अहवालाचे वर्गीकरण / सारांश तयार करणे.
 5. अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांच्या महाविद्यालय/विद्यापीठातील प्रवेश, नेमणुका, पदोन्नती या संदर्भातील प्रतिनिधींशी चर्चा करणे.
 6. विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात मान्यता असलेल्या रेमेडिअल कोचिंग योजनांच्या कामाचे निरीक्षण करणे.
 7. विद्यापीठातील अनुसूचित जाती जमातीचे कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण समितीचे कार्य करणे आणि गरज पडल्यास त्यांच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी योग्य ती मदत पुरविणे.

आरक्षण स्थिती (महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण धारेणानुसार) संवर्ग निहाय आरक्षण

 1. अनुसूचित जाती (SC) 13%
 2. अनुसूचित जमाती (ST) 7%
 3. व्ही.जे./एन.टी.=11% (व्ही.जे.(अ)- 3%, एन.टी.(ब)- 2.5%, एन.टी.(क)- 3.5%, एन.टी.(ड)- 2%
 4. विशेष मागासवर्गीय- 2%
 5. इतर मागासवर्गीय- 19%
 6. ESBC - 16%
 7. SBC(A) - 5%

विद्यापीठ स्तरीय सल्लागार समिती :-

अनुसूचित जाती-जमातींच्या संदर्भात असणाऱ्या आरक्षण धोरणांचे कार्यक्रम आणि ती धोरणे प्रभावीपणे राबविली जात आहेत की नाही हे पाहण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आलेली आहेत. राज्यशासन आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी नेमून दिलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या समितीतर्फे उपाय योजना सुचविण्यात येतात. या समितीची वर्षातून दोनदा सभा होते आणि त्यावेळी घेतलेले निर्णय राबविणे बंधनकारक आहेत.

सल्लागार समिती :-

मा. कुलगुरू, उमवि, जळगाव

अध्यक्ष

प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी,संचालक, जीवशास्त्र प्रशाळा

सदस्य

प्रा. डॉ. शोभा पी. शिंदे, संचालक, भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र

सदस्य

प्रा. डॉ. ए. एम. महाजन, कुलसचिव, उमवि जळगाव

सदस्य

प्रा. डॉ राजेंद्र ठाकरे, धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर

सदस्य

प्रा. एस. ए. मोरे, Z.B.Patil College, धुळे

सदस्य

प्राचार्य. डॉ. एन. एन. गायकवाड, कला आणि वाणिज्य महाविद्याल, भडगाव

सदस्य

प्राचार्य. डॉ. पी. एच. पवार, Z. B. Patil College, धुळे

सदस्य

प्राचार्य. डॉ. व्ही. व्ही. भास्कर, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जामनेर

सदस्य

डॉ. आर. जे वळवी, एस. सी./एस.टी. कक्ष, उमवि जळगाव

सदस्य सचिव

विद्यार्थी तक्रार निवारण समिती :
      विद्यापीठ व्यवस्थापन परिषद ठराव क्र. 103/2002,  दि. सप्टेंबर, 2002 नुसार माननीय कुलगुरू महोदयांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे.

 विद्यापीठ विद्यार्थी तक्रार निवारण समिती :

मा. कुलगुरू, उमवि, जळगाव

अध्यक्ष

प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर, संचालक, बीसीयुडी,उमवि., जळगाव

सदस्य

श्री. विष्णु रामदास भंगाळे, (व्यवस्थापन परिषद सदस्य), २९ वैष्णवी, ओंकार नगर, जळगाव

सदस्य

प्राचार्य डॉ. पी.एच. पवार (व्यवस्थापन परिषद सदस्य), झेड. बी. पाटील महाविद्यालय,धुळे

सदस्य

प्राचार्य. डॉ. डी .एल. तोरवणे (विद्या परिषद सदस्य) प्राचार्य सी. गो. पाटील, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, साक्री

सदस्य

प्रा. डॉ. बी. व्ही. पवार (अधिष्ठाता) प्रमुख संगणक शास्त्र प्रशाळा, उमवि., जळगाव

सदस्य

अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी परिषद

सदस्य

श्री. डी. आर. पाटील (अधिसभा सदस्य, नोदानिकृत पदवीधर) कासार गल्ली, मु. पो. धरणगाव, जी. जळगाव

सदस्य

कु.निलिमा मिश्रा (अधिसभा सदस्य, महिला प्रतिनिधी) भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन, बहादरपूर ता. पारोळा, जी. जळगाव

सदस्य

प्रा. डॉ. ए. एम. महाजन, कुलसचिव, उमवि जळगाव

सदस्य

प्रा. डॉ. शोभा पी. शिंदे, प्रमुख, तौलनिक भाषा व वाङ् मय विभाग,उमवि जळगाव

सदस्य

प्रा. डॉ. ए. यु. बोरसे, प्र. परीक्षा नियंत्रक, उमवि, जळगाव

आमंत्रित सदस्य

श्री. डी. एम. शिंदे, वित्त व लेखाधिकारी,उमवि जळगाव

आमंत्रित सदस्य

प्रा. डॉ. पी. एस. नन्नवरे, संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, उमवि, जळगाव

आमंत्रित सदस्य

श्री. एस. आर. भादलीकर, उपकुलसचिव, विधी व माहितीचा अधिकार, उमवि,जळगाव

सदस्य सचिव

विद्यार्थी -

      विद्यार्थी या कक्षाशी संपर्क साधून या कक्षातील संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक पदासाठी नावनोंदणी संदर्भात चौकशी करु शकतात, त्यांच्या स्कॉलरशिप संदर्भातील अडचणी सांगू शकतात. त्यांच्या समस्या निराकरणासंबंधी त्यांना कक्षातर्फे मदत करण्यात येते.


प्राध्यापक :

      विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी नेहमीच अनुसूचित जाती-जमाती कक्षाशी जबाबदारीच्या जाणीवेने जोडलेले गेलेले आहेत आणि त्यांच्या आरक्षणाचे धोरणे, नेमणुका, पगार न मिळणे यासंदर्भातील अडचणी ते नेहमी मांडत असतात.

एस.सी.-एस.टी. कक्ष मध्ये नावनोंदणी केलेल्या नेट/सेट/पीएच्.डी. अहर्ताधारकांची विषय निहाय यादी.

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon