Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
अधिव्याख्याता मान्यता विभाग
Minimize

व्याख्याता मान्यता विभागातील अधिकारी/कर्मचारी

अ.क्र. अधिकारी / कर्मचा-यांचे नाव पदनाम
०१ डॉ. आर. जे वळवी
उप कुलसचिव (अधिक कार्यभार)
०२   श्री. द. बी. बागले कक्षाधिकारी
०३
श्री.एफ.एस.शेक वरिष्ठ सहाय्यक
०४ श्री.रमेश सखाराम गांगुर्डे लघुलेखक (नि.श्रे.)
०५   श्री. एस. आर. महाजन
सहाय्यक
०६
सौ. स्मिता पी. पाटील
सहाय्यक
०७  श्री.राजेंद्र दगडू पाटील सहाय्यक
०८   श्री.दशरथ लक्ष्मण चौधरी सहाय्यक
०९   श्रीमती.माया संजयसिंग जाधव शिपाई

संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य पदांच्या नियुक्त्या

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये परिनियम ४१३- ब (२) अन्वये तरतूद आहे. या तरतुदीनूसार नियुक्त केलेल्या प्राचार्यांना मा.कुलगुरु महोदयांच्या अधिकारात मान्यता दिली जाते.

मागील २० वर्षाच्या काळात अनुदानित संलग्नित ८२ महाविद्यालयात ७५ प्राचार्य नियुक्त करण्यात आले असून त्यांना मा.कुलगुरु महोदयांनी मान्यता दिलेली आहे. तसेच कायम विनाअनुदानित ९० महाविद्यालये असून ५९ प्राचार्यांना मान्यता देण्यात आली आहे व ३३ परिसंस्था विद्यापीठाशी संलग्नित आहेत.

संलग्नित महाविद्यालयात नियुक्त केलेल्या प्राचार्यांना मान्यता देणेबाबतची कार्यवाही खालीलप्रमाणे करण्यात येते.

(अ)  महाविद्यालयाने विद्यापीठाकडे प्राचार्य पदाच्या जाहिरातीचा मसूदा सादर केल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन व विद्यापीठाच्या नियमानुसार शैक्षणिक     अर्हता व अनुभव तपासून जाहिरात मंजूर केली जाते.

(ब)  महाविद्यालयाने जाहिरात प्रसिध्द केल्यानंतर व विद्यापीठात जाहिरातीचे कात्रण सादर केल्यानंतर विद्यापीठ परिनियमानुसार मा.कुलगुरु महोदयांचे प्रतिनिधीची नियुक्ती केली जाते. तद्नंतर महाविद्यालये मुलाखतीचे नियोजन करतात.

(क)  महाविद्यालयात प्राचार्य पदाच्या मुलाखती झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराचा महाविद्यालयाकडून विद्यापीठात प्रस्ताव सादर करण्यात येतो. सदर प्रस्तावाची छाननी करुन मा.कुलगुरु महोदयांकडून मान्यतेसंदर्भात  मंजूरी घेतली जाते.

(ड)  मा.कुलगुरु महोदयांकडून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महाविद्यालच्या प्राचार्यांना मान्यता पत्र दिले जाते.

संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक नियुक्त पदाची कार्यवाही

विद्यापीठ परिनियम ४१५(१) अन्वये संलग्नित महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक नियुक्तीबाबत निवड समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्यात येते.

सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक नियुक्तीबाबतची प्रक्रिया 

(अ)  महाविद्यालयाने विद्यापीठात जाहिरात मसूदा सादर केल्यानंतर, सदर मसूदा तपासून मंजूर करण्यात येतो.

(ब)  सदर जाहिरातीचा मसूदा आरक्षण तपासणीसाठी मागासवर्गीय कक्षाकडे पाठविण्यात येतो.

(क) विद्यापीठाने जाहिरातीचा मसुदा मंजूर केल्यानंतर महाविद्यालयाकडून ती जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात येते तसेच सदर महाविद्यालयाने विद्यापीठाकडे विहित शुल्क जमा केल्यानंतर विद्यापीठामार्फत १०-१२ महाविद्यालयाच्या जाहिराती एकत्रित करुन राज्यस्तरीय वृत्तपत्रातून प्रसिध्द करण्यात येतात व विद्यापीठाच्या वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात येतात.

(ड)  संलग्नित महाविद्यालयाने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द केल्यानंतर त्या जाहिरातीचे  कात्रण विद्यापीठात सादर करण्यात येऊन महाविद्यालयाकडून निवड समितीची मागणी केली जाते.

(इ)  विद्यापीठ अनुदान आयोगाचे दिनांक २३ सप्टेबर, २००९ चे नियम व शासन निर्णय दिनांक ११/१२/१९९९ मध्ये नमूद केल्यानुसार निवड समिती दिली जाते.

सहायक प्राध्यापक पदासाठी खालीलप्रमाणे निवड समितीचे स्वरुप आहे.

(1)  महाविद्यालयास व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी हे निवड समितीचे अध्यक्ष असतील.

(2)  संलग्नित महाविद्यालयाचे मा.प्राचार्य

(3)  सेवाज्येष्ठ प्राध्यापक/विभागप्रमुख (संबंधित विषयाचा) शक्यतोवर १० वर्षाचा अनुभव असलेला.

(4)   मा.कुलगुरुंचे दोन प्रतिनिधी त्यात एक संबंधित विषयाचा विषयतज्ज्ञ असावा.

(5)  संलग्नित महाविद्यालयाशी संबंधित नसलेल्या मंजूर केलेल्या पॅनेलमधील २ विषयतज्ज्ञची संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष यांनी नियुक्ती करावयाची आहे. 

उपरोक्त पॅनेल व्यतिरिक्त परिनियमामधील तरतुदीनूसार मा.कुलगुरु महोदयांनी नियुक्त केलेले १  मा.कुलगुरु महोदयांचे प्रतिनिधी. तसेच मा.कुलगुरु महोदयांनी नियुक्त केलेले राखीव संवर्गाचे प्रतिनिधी / प्राध्यापक / सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभाग, जळगाव अशा प्रकारे निवड समिती गठीत करण्यात येते.

(ई)  उपरोक्त निवड समिती विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना दिनांक २३/०९/२००९ व महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक ११/१२/१९९९ अन्वये गठीत करण्यात येते.

(उ)  विद्यापीठाने निवड समिती दिल्यानंतर महाविद्यालये मुलाखती आयोजित करतात व निवड समितीच्या अहवालासह विद्यापीठात मान्यता प्रस्ताव सादर करतात. सदर प्रस्तावाची व्याख्याता मान्यता विभागात छाननी करण्यात येते व मा.कुलगुरु महोदयांकडे शिफारस सादर करण्यात येते, त्यानुसार सदर प्रस्तावास मा.कुलगुरु महोदय मान्यता देतात. तद्नंतर महाविद्यालयास व संबंधित अधिव्याख्यात्यास मान्यता पत्रे देण्यात येतात.

(ऊ)  शैक्षणिक वर्ष २०००-२००१ पासून ते आजपर्यंत ४६८३ मान्यता प्रकरणांना मा.कुलगुरु महोदयांनी मंजुरी दिलेली आहे.

संलग्नित महाविद्यालयात तात्पुरत्या नियुक्त व्याख्यात्यांना मान्यता देणेबाबतची कार्यवाही

(अ) विद्यापीठ परिनियम ४१५(३) अन्वये एका टर्मकरीता/६  महिन्यांकरीता संबंधित विभागप्रमुख/प्राचार्य यांच्या शिफारशीनुसार तात्पुरती नियुक्ती करण्यात येते.

संलग्नीत महाविद्यालयातील तात्पुरत्या नियुक्तीच्या कालावधी ६ महिन्यांपेक्षा जास्त व १ वर्षापेक्षा कमी असेल तर विद्यापीठ परिनियमातील तरतुदीनूसार खालीलप्रमाणे निवड समिती गठीत करण्यात येते.

तात्पुरत्या नियुक्तीसाठी विद्यापीठ परिनियमानुसार निवड समितीचे स्वरुप

(1)  संलग्नित महाविद्यालयातील व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी.

(2)  संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा संस्थेचे प्रमुख.

(3)  संलग्नित महाविद्यालयातील संबंधित विषयाचे विभागप्रमुख/संबंधित संस्थेचे त्या विषयाचे विभागप्रमुख.

(4)  विद्यापीठाने दिलेल्या निवड समितीमधील एका विषयतज्ज्ञांना व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष यांनी नियुक्त करावयाचे असते. तसेच संलग्नित महाविद्यालाचे प्राचार्य हे निवड समितीचे सचिव असतात.

(ब)  संलग्नित महाविद्यालयाने मुलाखती घेतल्यानंतर व विद्यापीठास मान्यता प्रस्ताव पाठविल्यानंतर, व्याख्याता मान्यता विभाग सदर प्रस्तावाची छाननी करुन निवड झालेला उमेदवार विद्यापीठ अनुदान आयोग/महाराष्ट्र शासन निर्णय/विद्यापीठाचे नियम यांची पूर्तता करीत असेल तर शिफारस करते व सदर प्रस्तावास मा.कुलगरु महोदय मंजुरी देतात. मात्र निवड झालेल्या उमेदवाराची ६ महिन्यांकरीता किंवा एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी नेमणूक केलेली राहील.

संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना नेट/सेट मधून सूट देणेबाबत 

विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील व्याख्यात्यांना विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचे दिनांक ०५ ऑक्टोबर,१९९१ च्या निर्देशानुसार अधिव्याख्याता पदासाठी दिनांक १९ सप्टेबर १९९१ पासून नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाची पहिली अधिसूचना जुलै, २००२ च्या निर्देशानुसार डिसेंबर, २००२ पर्यंत ज्या प्राध्यापकांनी पीएच्.डी. प्रबंध सादर केले असतील अशा प्राध्यापकांना नेट/सेट मधून सूट देणेबाबत निर्देश आहेत. सदर निर्देशानुसार डिसेंबर, २००२ पर्यंत पीएच्.डी. प्रबंध सादर करणा-या प्रकरणांना नेट/सेट मधून सूट देण्यात आलेली आहे.

तसेच प्रलंबित व्याख्याता मान्यता प्रकरणांना मान्यता देण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांनी समिती गठीत केली होती. सदर समितीच्या शिफारशीवरुन ४३ प्रलंबित व्याख्याता मान्यता प्रकरणांना मान्यता देण्यात आलेल्या आहे.

 तक्रार निवारण समिती

तक्रार निवारण समितीकडे 2000 ते 2011 या कालावधीत 195 प्रकरणे आली होती त्यांपैकी 132 प्रकरणांबाबत समितीने निर्णय दिला आहे.

तक्रार निवारण समिती सदस्य -

अ.क्र.

नाव / महाविद्यालयाचे नाव

पदनाम

०१

मा.प्राचार्य, डॉ.अरविंद नारायण  चौधरी,
भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय
भुसावळ, जि.जळगांव

अध्यक्ष

०२

मा.प्राचार्य. डॉ. एम इक्बाल शाह, 
एच. जे. थिम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरुण,जळगांव

सदस्य

०३

मा.श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे, 
जिजामाता शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार, जि. नंदुरबार

सदस्या

०४

मा.प्रा.डॉ.राजेंद्र शंकरराव पाटील, 
पी.एस.जी.व्ही.पी.संस्थेचे, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा, जि. नंदुरबार

सदस्य

०५

प्राचार्य.डॉ. दादासाहेब लक्ष्मण तोरवणे, 
विद्या विकास मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साक्री, जि.धुळे.

सदस्य

०६

मा.प्राचार्य.डॉ.किशोर भिका पाटील, 
बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला व विज्ञान महाविद्यालय, सोनगीर, ता. जि.धुळे

सदस्य

०७

मा. प्रा. डॉ. अ. म. महाजन, कुलसचिव, उमवि,जळगाव.

सदस्य-सचिव

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon