Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
विद्यापीठात कसे पोहचाल?
Minimize

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव शहरापासून १०  कि.मी. अंतरावर आहे. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तर बाजूला (उत्तरेकडे) जळगाव जिल्हा आहे. बस, रेल्वे आणि इतर 
दळणवळण साधनांनी तुम्ही जळगाव शहरात पोहचू शकता आणि विद्यापीठ परिसरात पोहचण्यासाठी तुम्ही शहर बस सेवा वा ऑटो रिक्षा या साधनांचा वापर करु शकता. 

रेल्वेने
जळगाव :
जळगावातील रेल्वे स्थानक देशातील अनेक प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले असल्याने तुम्ही जळगावला येण्यासाठी रेल्वेचा वापर करु शकता. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, भोपाळ, अहमदाबाद व सुरत या शहरातून सातत्याने रेल्वे सेवा उपलब्ध आहे. भुसावळ हे जळगावपासूनचे सर्वात जवळचे जंक्शन २६  कि.मी. अंतरावर आहे. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकोता, भोपाळ, अहमदाबाद व सुरत येथून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना भुसावळ येथे थांबा आहे.

रेल्वे वेळापत्रक आणि आरक्षण याबाबत माहिती मिळविण्यासाठी http://www.indianrail.gov.in/  वर भेट द्या.

रस्ता मार्गे जळगाव :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६  (NH6), आशियन महामार्ग क्र. ४६ आणि जळगाव-औरंगाबाद महामार्ग यांनी जळगाव शहर महाराष्ट्रातील जवळच्या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. जळगावसाठी बस सुविधा सातत्याने उपलब्ध आहेत . मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक येथून जळगावला येण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत.

     

शहर

जळगावपासून अंतर (अंदाजे)

मुंबई

४१९  कि.मी.

नाशिक

२४५ कि.मी.

धुळे

५२  कि.मी.

पुणे

४४९  कि.मी.

औरंगाबाद

१५८  कि.मी.

नागपूर

४२८  कि.मी.

सुरत

३१२  कि.मी.

 

हवाई मार्गे जळगाव :

जळगावपासून अंदाजे १५८  किमी अंतरावर जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे. हे विमानतळ मुंबई व पुणे या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. औरंगाबादहून जळगावला येण्यासाठी बस किंवा खाजगी वाहन वापरू शकता.  जळगावलाही विमान वाहतूक सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे. 

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon