Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

डॉ. मनीषा इंदाणी

प्रभारी विभाग प्रमुख,
शिक्षणशास्त्र प्रशाळा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
शिक्षणशास्त्र प्रशाळा
Minimize

शाश्वत विकासाबद्दलची बांधीलकी आणि व्यावसायिक गुणवत्तापुर्ण शक्षण या दृष्टिकोनातून सन २००६ मध्ये शिक्षणशास्त्र विभागाची स्थापना झाली. विभागात एम.एड. हा अभ्यासक्रम चालविला जातो.भविष्यकालीन आव्हानाना सामोरे जाण्यासाठी आणि प्रशिक्षण्यार्थ्याचा सर्वागिण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि संशोधनात्मक सुविधा विभागाकडून पुरविल्या जातात.

अल्पावधीतच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात विभागाने यश प्राप्त केले आहे.विभागातून विद्यार्थ्यांना नेट-सेट आणि करिअर मार्गदर्शनही पुरविले जाते. याचा परिणाम विभागातील ६५ विद्यार्थी आजपर्यंत नेट-सेट पात्र झाले आहेत. ऐवढेच नाही तर चर्चासत्रे व परिषदाचे आयोजन करून भोवतालच्या संशोधनविषयक उपक्रमांत सहभागी होण्याचा प्रयत्नदेखील विभागामार्फत होतो.

शिक्षणशास्त्र विभागास एन.सी.टी.ई कडून ८४२ कोडसह मान्यता प्राप्त झाली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासंदर्भात विश्वास विकसित करण्यास विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे.विभागात एकूण ३५ इतकी प्रवेश क्षमता आहे.यामुळे शिक्षकांकडून वैयक्तीक लक्ष देणे शक्य झाले आहे. विभागामध्ये सुसज्ज विभागीय ग्रथालय ,संगणक प्रयोगशाळा,शैक्षणिक तंत्रविज्ञान प्रयोगशाळा आणि मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विकसित केल्या आहेत.यामूळेच विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करण्यास मदत होत आहे.

Copyright 2012 North Maharashtra University, Jalgaon