Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

प्रा. स. र. कोल्हे
संचालक,
संगणकशास्त्र प्रशाळा,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव .

संगणकशास्त्र प्रशाळा
Minimize

संगणकशास्त्र विभागाची स्थापना ऑगस्ट, 1994 मध्ये झाली. एम.सी.ए., एम.एस्सी (संगणकशास्त्र) आणि एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान) असे तीन अभ्यासक्रम या प्रशाळेत चालविले जातात. प्रशाळेचे क्षेत्रफळ अंदाजे 24000 चौ.फूट आहे.

अद्ययावत गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरविण्याच्या बाबतीत आणि सतत बदलणार्‍या सॉफ्टवेअर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या कुशल व्यावसायिकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्याच्या बाबतीत खूप कमी कालावधीत प्रशाळेने प्रतिष्ठा आणि लोकप्रियता प्राप्त केली आहे.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विविध संधी आणि नवनवीन आव्हाने यांच्याशी विद्यार्थ्यांना सामना करता यावा म्हणून स्वतंत्र संगणकीय व्यवस्था असलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा प्रशाळेत आहेत.

संगणकीय सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्यांना पुरेसा प्रयोगशाळा कालावधी उपलब्ध करुन दिला जातो. उच्चशिक्षित, अनुभवी आणि नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यास व आपली कौशल्ये अद्ययावत करण्यास उत्सुक शिक्षक वर्ग ही आमची मुख्य जमेची बाजू आहे. एक उत्तम माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक म्हणून विद्यार्थ्यांची जडणघडण व्हावी यावर आमचा विश्वास असल्याने आम्ही सर्वसमावेशक, घरगुती आणि खुली संस्कृती विभागात राखतो. 

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon