Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

प्रा. मुक्ता महाजन
संचालक,
भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र
Minimize

भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राची स्थापना 1 ऑगस्ट, 1999 रोजी झाली. हा विभाग संस्कृती, मूल्य शिक्षण, वाङ्‌मय आणि भाषा व बोली यांचा अभ्यास याबाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रशाळेत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या विषयांचे पदव्युत्तर वर्ग चालविले जातात. तसेच पीएच. डी. साठीही प्रवेश उपलब्ध आहेत.  वर्ष 2013-2014 पासून शैक्षणिक स्वायत्तता घेण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्याचा मार्ग प्रशस्त करण्याच्या हेतूने भाषिक आणि वाङ्‌मयीन कौशल्ये विकसित करण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी देखील विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

मर्यादित विद्यार्थीसंख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे अध्यापकांना शक्य आहे. केंद्रीय ग्रंथालयाबरोबरच विद्यार्थ्यांना विभागीय ग्रंथालयाची सुविधाही उपलब्ध आहे. हिरवळीवरील विद्यर्थ्यांचे वसतिगृह शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास उपकारक आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचा कल आणि अभ्यासपूरक उपक्रमांमधील सहभागाची सवय निर्माण व्हावी यासाठी विविध कार्यशाळा, परिषदा, संशोधन उपक्रम, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन विभागात केले जाते. नोकरीच्या चांगल्या संधी विद्यार्थ्यांना मिळाव्यात म्हणून स्पोकन इंग्लिश कोर्स, नोकरी-व्यवसायविषयक मार्गदर्शन आणि कॅम्पस्‌ इंटरव्ह्यूस्‌ यांचे आयोजन केले जाते.

Department of Hindi received grant of Rs. 52 lakhs & 50 thousand by the UGC for the up gradation of the dept. Under XII Plan five posts are sanctioned.

Copyright 2012 by North Maharashtra University,Jalgaon