Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

 

डॉ. अनिल पृथ्विराज डोंगरे,

समन्वयक,
बुध्दीस्ट अभ्यास आणि संशोधन केंद्र,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

 

बुध्दीस्ट अभ्यास आणि संशोधन केंद्र
Minimize
मानवतावादी दृष्टीकोण ठेवून संबंध मानवी कल्याणाची भूमिका असणारा 'बुध्द धम्म' ही जगातील प्राचीन अशी विचार प्रणाली आहे. दोनहजार पाचशे वर्षापुर्वी भारतामध्ये सिध्दार्थ गौतमबुध्दांनी ही विचार प्रणाली मानवाच्या सर्वांगिण विकासासाठी उदयास आणली. बुध्दाची विचार प्रणाली दैववादी नसून बुद्धीप्रामाण्यवादी विचारसणीतून दुःखाचे निराकरण करणारी आहे. बुध्दाच्या धम्माची काही मुलभूत शिकवणी आहे. यात प्रामुख्याने तीन वैश्विक सत्य, चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगीक मार्गाचा समावेश होतो. बुध्द विचार प्रणालीमध्ये कर्माला अनुसरुन बुध्द असे सांगतात की, प्रत्येक घडणारी घटना ही दुसर्याप घटनेला जन्म देते परंतु त्या घटनेचे अस्तीत्व हे पहिल्या घटनेच्या माध्यमातून होते, मग ती घटना कदाचित सुखदायक किंवा दुःखदायक असु शकते. म्हणूनच कर्माचे सूत्र असे शिकवण देते की, विघातक कर्माची जबाबदारी ही जो मनुष्य विघातक कर्म करतो त्याचीच संपूर्णपणे असते.
बुध्दाच्या विचार सरणीची, त्यांनी सांगीतलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला सुध्दा आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचार प्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचार प्रशाळा अंतर्गत २०१२-२०१३ या शैक्षणिक वर्षात बुध्दीस्ट अभ्यास आणि संशोधन केंद्ग स्थापन करण्यात आलेले आहे
Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon